
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या शोमुळे तूफान चर्चेत आलीये. नुकताच नव्याच्या सीजनचा दुसरा भाग आलाय.

यावेळी श्वेता बच्चन, जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा दिसत आहेत. यावेळी नव्या म्हणाली की, जया बच्चन खूप चिल आहेत. यावर थेट मोठे विधान करताना श्वेता बच्चन दिसली.

श्वेता बच्चन म्हणाली की, असे अजिबातच नाहीये. जया बच्चन (आई) अजिबात चिल नाहीये. परंतू तरूण लोकांना आईचा स्वभाव आवडतो.

नव्याने सांगितले की, जया बच्चन यांना तरूण लोकांसोबत वेळ घालवायला अधिक आवडतो. नव्या म्हणाली की, जया ज्याप्रमाणे तिच्या मित्रांसोबत बोलते ते पाहणे खूप फॅनी वाटते.

नव्याने हे देखील सांगितले की, ज्यावेळी श्वेताचे मित्र जया बच्चन यांचा मजाक उडवतात त्याला देखील जया बच्चन एन्जाॅय करतात.