Shweta Tiwari: श्वेता तिवारीसोबत लग्नाच्या चर्चा; ट्रोलर्सची पर्वा न करता अभिनेत्याने उचललं हे पाऊल

Shweta Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विशाल सिंहशी जोडलं जात आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

| Updated on: Sep 17, 2026 | 8:26 AM
1 / 5
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनेता विशाल आदित्य सिंह यांच्या नात्याबद्दल गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवाही अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, विशालने यापूर्वी या चर्चांवर स्पष्टीकरण देत श्वेतासोबत फक्त मैत्रीचं नातं असल्याचं स्पष्ट केलं.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनेता विशाल आदित्य सिंह यांच्या नात्याबद्दल गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवाही अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, विशालने यापूर्वी या चर्चांवर स्पष्टीकरण देत श्वेतासोबत फक्त मैत्रीचं नातं असल्याचं स्पष्ट केलं.

2 / 5

आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह गणपती पूजेत सहभागी होताना दिसत आहेत. विशालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर गणपती उत्सवातील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

3 / 5

यामध्ये दोघांमधील बॉन्डिंगही पाहायला मिळतेय. गणपती बाप्पाची पूजा करताना दोघंही एकत्र असल्याने चाहत्यांचं लक्ष या व्हिडीओकडे वेधलं गेलं. श्वेता आणि विशाल यांच्या नात्याबद्दल याआधीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोघांची ओळख ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर झाल्याचं सांगितलं जातं.

4 / 5

यापूर्वी श्वेता आणि विशालच्या लग्नाच्या अफवाही सोशल मीडियावर चर्चेत होत्या. त्यावेळी विशालने या चर्चांवर प्रतिक्रिया देताना लग्नाबाबत त्याची भूमिका स्पष्ट केली होती. "एखाद्यासोबत राहायचं असेल तर लग्न करण्याची काय गरज आहे? ज्याप्रकारे हल्ली घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय, ते पाहून मला लग्नच करायचं नाहीये. लग्न करून घटस्फोट द्यायचा नाहीये. जगात जे घडतंय, ते माझ्यासोबतही घडेल", असं तो म्हणाला होता.

5 / 5

अफवांमुळे काही काळ दोघांनी भेटणं टाळल्याचं विशालने एका मुलाखतीत सांगितलं होतं. समाजातील चर्चांमुळे त्याने श्वेताला भेटणं कमी केलं होतं आणि दोघं लपूनछपून भेटत असल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र, आता गणपती पूजेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघंही अशा चर्चांची पर्वा करत नसल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us