वजन कमी करण्यासाठी Dieting! शरीराचं होऊ शकतं हे नुकसान…
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे आणि डायटिंग करणे या गोष्टी लोक सतत करतात. वजन कमी करण्यासाठी लोक प्रचंड प्रयत्न करतात. यात वेगवेगळ्या पद्धतीचे डायटिंग सुद्धा असते. हे झालं की ते, बरेच डायटिंगचे प्रकार सध्या पाहायला मिळतात. पण या डायटिंगने काय नुकसान होतं? जाणून घेऊया...

डायटिंगने आरोग्याला खूप फायदे होतात हा आपला गैरसमज आहे. वजन कमी करण्यासाठी आपण जे डाएट करतो ते जर डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलं नाही तर त्याचे अनेक परिणाम होतात. काय तोटे होतात? आरोग्यावर काय परिणाम होतात? वाचा

low calorie diet

विचार न करता डाएटिंग केल्याने तुमच्या शरीराचे मेटाबॉलिज्म देखील कमकुवत होते. त्यामुळे पुरेसे अन्न खाणे गरजेचे आहे. तसेच नियमित अंतराने हेल्दी खात रहा. नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण कधीही सोडू नका.

कमी कॅलरीयुक्त आहार सर्व लोकांना सूट होत नाही. कमी कॅलरीयुक्त डाएट सुरु करताना आधी तज्ञांचा सल्ला घ्या. कॅलरीची संख्या कमी असेल तर शरीरावर परिणाम होतो.

किडनी स्टोन: डायटिंग करताना किडनी स्टोनची समस्या उद्भवते. बराच वेळ भूक लागली तरी आपण काही खात नाही, यकृत कोलेस्टेरॉल सोडण्यास सुरुवात करते. पित्ताशयात कोलेस्टेरॉल वाढते आणि मग स्टोन होण्याचा धोका वाढतो. या दरम्यान पोटाच्या आणि पाठीच्या वरच्या भागात दुखण्याची समस्या उद्भवू शकते.