
पुद्दुचेरी ला भारतातील छोटं फ्रान्स म्हणून देखील ओळखलं जातं. फ्रान्सचा पुद्दुचेरीवर अनेक वर्षे अधिकार होता. पुद्दुचेरीच्या फ्रेंच वसाहतीत आजही फ्रेंच संस्कृती आणि वास्तूशास्त्राचं दर्शन घडतं.

पुद्दुचेरीमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. याठिकाणी बरीच प्रसिद्ध मंदिरं, चर्च आणि मशिदी आहेत.

पुद्दुचेरीमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, जसं की तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषा. याशिवाय येथे फ्रेंच आणि इंग्रजी भाषा देखील बोलल्या जाते.

पुद्दुचेरीतील लोकांचा पोशाख हा तामिळनाडूसारखाच आहे. येथे फ्रेंच आणि तामिळ संस्कृतीचं मिश्रण लोकांच्या वेषात दिसतं.

पुद्दुचेरीमध्ये असे काही सण आहेत, जे खासकरुन तामिळनाडूमध्ये साजरे केले जातात. जसे पोंगलसारखे अनेक सण तमिळनाडूप्रमाणेच साजरे केले जातात.