
गायिका सावनी रविंद्रने आत्तापर्यंत सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

लवकरच सावनीचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. याच गाण्याच्या निमित्ताने सावनीने खास पोस्ट शेअर केली आहे.

सावनीच्या नव्या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचे तिने खास फोटोशूट केलं आहे.

केशरी रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाउज असा सावनीचा लुक पाहायला मिळतोय.

या लुकमध्ये सावनी खूप सुंदर दिसतेय. "ये ना.." असे सावनीच्या या नव्या गाण्याचे बोल आहेत.

25 डिसेंबर रोजी सावनीचं हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मात्र, या गाण्याआधी सावनीच्या फोटोंनाही तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.