
भारत हा जगातील सर्वात मोठा व्हिस्की उत्पादक देश आहे. अलिकडच्या दशकांमध्येच तो जागतिक प्रीमियम व्हिस्की क्षेत्रात एक मोठा स्पर्धकही बनला आहे.

ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत व्हिस्की भारतात आली. ब्रिटिश स्थलांतरितांनी स्कॉच व्हिस्कीमध्ये रस निर्माण केला आणि या स्पिरिटला लवकरच लोकप्रियता मिळाली.

भारतातील पहिले सिंगल माल्ट 2 दशकांपूर्वी आले होते. आता भारतीय सिंगल माल्टला जागतिक मान्यता मिळाली आहे.

मात्र ही सिंगल माल्ट व्हिस्की कशी बनवतात? याबाबत व्हिस्की प्रेमींना कायम कुतूहल असतं.

सिंगल माल्ट व्हिस्की फक्त माल्टेड बार्लीपासून बनवली जाते. माल्टेड बार्ली अंकुरित केली जाते, नंतर वाळवली जाते आणि नंतर मॅश करून शिजवली जाते.

सिंगल माल्ट व्हिस्की सहसा ओक बॅरलमध्ये परिपक्व होते. ज्यामुळे या व्हिस्कीच्या विशेष नोट्स आणि चव तयार होतात

परिपक्वता जितकी जास्त तितकी सिंगल माल्टची किंमत अर्थात सिंगल माल्ट प्रेमींची कमतरता नसल्याने यासाठी लोक हवे तेवढे पैसे मोजण्यास तयार असतात.