
पुण्यात ऐतिहासिक अन् पर्यटन स्थळ म्हणून सिंहगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते.

एका आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली. म्हणून कोंढाणा नाव झाले. शिवाजी महाराजांच्या काळात तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला चढाई करुन जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. त्यानंतर या किल्ल्यास सिंहगड हे नाव पडले.

Sinhगडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.agad Fort

इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे.

गडावर कोंढाणेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.