Healthy Habits | निरोगी आयुष्यासाठी लावा ‘या’ सवयी!

चांगल्या आरोग्यासाठी आपण काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्य नीट होऊ शकतं. असे कोणते पदार्थ आहेत ज्याने आरोग्य सुधारू शकतं? चला बघुयात...

| Updated on: Sep 05, 2023 | 3:01 PM
1 / 5
आहारात गुळाचा समावेश करा. दररोज गूळ खाणं कधीही चांगला. आजकाल अनेक लोकं साखरेला गुळाने रिप्लेस करत आहेत. साखरेपेक्षा गूळ कधीही चांगला ऑप्शन आहे. साखर ही प्रक्रिया करून बनवलेली असते, गूळ खाणे कधीही योग्य!

2 / 5
जेवणाआधी थोडंसं पाणी प्यायल्यास पचनक्रिया नीट होते. थोड्याशा प्रमाणात पाणी प्यायलं की पोटातील आम्ल पातळ होते, पचनक्रिया मंदावते आणि सुरळीत होते. पुढच्यावेळी जेव्हा जेवण कराल त्याआधी पाणी प्यायला विसरू नका.

3 / 5
जेवण बनवताना तेलाचा वापर करू नका. तेलाने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जेवण बनवताना तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करा किंवा कमी प्रमाणात तेलाचा वापर करा. तेलाचा कमी वापर केल्यास आरोग्य चांगले राहील.

4 / 5
मेथीचे दाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचे सेवन करणे कधीही योग्य. मेथीचे दाणे पचनक्रिया सुरळीत करतात, रक्तातील साखरेची पातळी कमी करतात, कोलेस्टेरॉल कमी करतात. याचा आहारात नक्की समावेश करावा.

5 / 5
तिखट लागतात म्हणून हिरव्या मिरच्या खाणे आपण टाळतो. हिरव्या मिरच्या खाण्याचा खूप फायदा असतो. या मिरच्या पचनास मदत करतात, चयापचय वाढवण्यास मदत करतात. हिरव्या मिरच्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात.

Follow Us