80 टक्के की 100 टक्के, स्मार्टफोनची बॅटरी किती टक्के चार्ज करावी? Golden Rule काय?

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी १००% चार्ज करण्याची सवय तिच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे लिथियम-आयन बॅटरीवर ताण येतो, ती गरम होते आणि तिचे आयुष्य कमी होते.

| Updated on: Oct 13, 2025 | 6:31 PM
1 / 8
मोबाईल फोन आपल्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, मात्र त्याची बॅटरी किती टक्के चार्ज करावी याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ बॅटरीचे आयुष्य टिकवण्यासाठी फोन २० टक्के ते ८० टक्के या मर्यादेत चार्ज करण्याचा सल्ला देतात.

2 / 8
मात्र युजर्सला त्यांचा स्मार्टफोन १०० टक्के पूर्ण चार्ज असावा असे वाटते. परंतु, आता मोबाईल फोनच्या बॅटरीसंदर्भात तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

3 / 8
तुमची १०० टक्के चार्जिंगची सवय बॅटरीच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. पण यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढवण्याऐवजी ते झपाट्याने कमी होतं, असे तज्ज्ञांचे मत आहे.

4 / 8
सध्याच्या स्मार्टफोनमध्ये प्रामुख्याने लिथियम-आयन (Lithium-ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरी १०० टक्के चार्ज केल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते.

5 / 8
बॅटरी १०० टक्के चार्ज केली तर फोन जास्त गरम होतो आणि ही उष्णता बॅटरीची क्षमता हळूहळू नष्ट करते. प्रत्येक बॅटरीला मर्यादित चार्ज-डिस्चार्ज सायकल असतात. पूर्ण १०० टक्के चार्ज केल्यास या सायकल लवकर संपतात. त्यामुळे ती लवकर जुनी होते.

6 / 8
अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी फोन चार्जिंगला लावतात. फोन १०० टक्के चार्ज झाल्यानंतरही जर तो बराच वेळ पॉवर सप्लायशी जोडलेला राहिला, तर बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे मोठे नुकसान होते.

7 / 8
मोबाईल फोनच्या बॅटरीचे आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी एक सोपा नियम सांगितला आहे. मोबाईल फोनची बॅटरी २० टक्के ते ८० टक्क्यांच्या दरम्यानच चार्ज करावी. कारण १०० टक्के चार्जिंगच्या तुलनेत ८० टक्के चार्जिंगमुळे बॅटरीवर कमी ताण येतो आणि ती गरम होण्याची शक्यता कमी होते.

8 / 8
त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या महागड्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ चांगल्या स्थितीत ठेवायची असेल, तर १०० टक्के चार्ज करण्याची सवय बदला. त्याऐवजी ८० टक्के चार्जिंगच्या मर्यादेचे पालन करा.