मैत्रीतील विश्वासघातावर प्रचंड सुंदर गाणं, ऐकताच हृदयाला भिडते, 41 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

अनेक दशकांनंतरही लोकप्रिय आहे ‘आखिर क्यों?’ या चित्रपटामधील हे सदाबहार गाणं; मैत्रीतील विश्वासघाताचे दुःख मांडणारे गाणं आजही अनेकांच्या हृदयाला भिडते.

| Updated on: Aug 09, 2026 | 1:33 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेम, विरह, दुःख आणि नात्यांमधील विश्वासघात यांसारख्या भावनांना सुरेल शब्द आणि संगीताची साथ मिळाल्याने ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेम, विरह, दुःख आणि नात्यांमधील विश्वासघात यांसारख्या भावनांना सुरेल शब्द आणि संगीताची साथ मिळाल्याने ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

2 / 5

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आखिर क्यों?’ या चित्रपटातील ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे असेच एक सदाबहार गाणं आहे. या गाण्यावर स्मिता पाटील आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रीकरण करण्यात आले होते.

3 / 5

हे भावस्पर्शी गाणे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याला राजेश रोशन यांनी संगीत दिले असून गीतकार इंदिवर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत.

4 / 5

‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ या ओळींमधून जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या विश्वासघाताचे आणि त्यातून झालेल्या वेदनेचे प्रभावी चित्रण होते. आपल्याच माणसाने दिलेला धक्का हा अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या दुःखापेक्षा अधिक वेदनादायी असतो, ही भावना गाण्यातून अत्यंत हळुवारपणे व्यक्त होते.

5 / 5

त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि सदाबहार गाणं म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us