Smriti Irani : तुलसी विराणी ते BJP कार्यकारिणीत मोठी जबाबदारी.. स्मृती इराणींचा थक्क करणारा प्रवास

भाजपने नव्या कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर, स्मृती इराणींचा राजकीय प्रवास चर्चेत आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला.

| Updated on: Aug 17, 2026 | 5:51 PM
1 / 8
देशात पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या तयारीला अधिक बळकटी देण्यासाठी नवी टीम तयार केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी नव्या टीमची, कार्यकारिणीची घोषणा केली. या टीममध्ये 13 उपाध्यक्ष आणि 8 सरचिटणीसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे. यानिमित्ताने स्मृती इराणी यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास, त्यांची संपत्ती आणि त्यांचे उत्पन्नाचे स्रोत यावर टाकूया एक नजर ( Photos : Instgram / Social Media)

2 / 8
स्मृती इराणी यांचा प्रवास हा ग्लॅमरच्या दुनियेपासून राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रापर्यंत पोहोचलेली एक रंजक कहाणी आहे. त्यांचे वडील अजय कुमार मल्होत्रा पंजाबी समुदायातील, तर आई शिबानी बागची बंगाली ब्राह्मण कुटुंबातील आहेत. त्यांना दोन बहिणी आहेत. 2001 साली स्मृती इराणी यांनी जुबिन इराणी यांच्याशी विवाह केला. स्मृती यांचा हा पहिला विवाह होता, तर जुबिन यांचे यापूर्वी मोना इराणी यांच्याशी लग्न झालं होतं. जुबिन आणि मोना यांची मुलगी शनेल इराणी हिला स्मृती स्वतःच्या मुलीप्रमाणेच मानतात. स्मृती आणि जुबिन यांना जोहर आणि जोइश ही दोन मुले आहेत. जोहरचा जन्म 2001 मध्ये, तर जोइशचा 2003 मध्ये झाला. शनेलने 2023 मध्ये अर्जुन भल्ला यांच्याशी विवाह केला.

3 / 8
शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर  स्मृती यांनी 1991 मध्ये हायस्कूल, तर 1993 मध्ये इंटरची परीक्षा पास केली. 1994 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठात बीकॉमसाठी प्रवेश घेतला; मात्र ते शिक्षण पूर् झालं नाही. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पुढे अभिनयाच्या दुनियेतही स्वतःची ओळख निर्माण केली. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतील तुलसी विरानीच्या भूमिकेद्वारे त्या प्रत्येक घरांत पोहोचल्या.

4 / 8
 2003मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्यांची राजकारणात एन्ट्री झाली.  एका वर्षानंतर, 2004 मध्ये त्यांनी दिल्लीतील चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी त्यांचा 79,415 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये स्मृती यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. त्या वेळी पराभव झाला असला, तरी राष्ट्रीय राजकारणातील त्यांची छाप अधिक ठळक झाली.

5 / 8
त्याच वर्षी त्यांच्याकडे मानव संसाधन विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे त्यांनी वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण तसेच महिला व बालविकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालयेही सांभाळली. 2019 मध्ये अमेठीत मात्र पूर्ण चित्र पालटलं. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा 55,120 मतांनी पराभव करत मोठा राजकीय उलटफेर धक्का दिला.  असं असलं तरीही 2024 साली मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणींचा 1,67,196 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

6 / 8
2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, स्मृती इराणी यांच्या नावे सुमारे 8.75 कोटी रुपये, तर पती जुबिन इराणी यांच्या नावावर सुमारे 8.82 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 1,08,740 रुपये रोख, तर जुबिन यांच्याकडे 3,21,700 रुपये रोख होते. स्मृती यांच्या बँक खात्यांमध्ये 25,48,497 रुपये जमा असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं.

7 / 8
स्मृती यांच्या नावावर सुमारे 16.55 लाख रुपयांचे कर्ज होते, मात्र त्यांचे पती,  जुबिन यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. स्मृती यांच्या कारचाही त्यात उल्लेख आहे, त्यांच्याकडे सुमारे 27 लाखांची कार  असून, जुबिन यांच्या कारची किंमत 4.70 लाख रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

8 / 8
स्मृती इराणी यांची अचल संपत्ती 11.17 कोटी तर एकूण संपत्ती 17.57 कोटी असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. स्मृती इराणी यांचे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये 2 फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये पती जुबिन यांचा 50 टक्के हिस्सा आहे.  तर 2021 मध्ये त्यांनी अमेठीतील गौरीगंज परिसरात 11 बिस्वा जमीन खरेदी केली होती. 2024 च्या सुरुवातीपर्यंत या जमिनीवर त्यांचं घरही तयार झालं होतं. याशिवाय गोवा आणि पुणे येथेही त्यांच्या काही मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us