
भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

विवाह सोहळ्याची मानधना कुटुंबाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. लग्नसोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल देखील वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झाला आहे.

मानधना परिवाराकडून नवरदेव पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे दणक्यात स्वागत करण्यात आलं. पलाशचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून ढोल-ताशांच्या संगतीने जंगी स्वागत करण्यात आलं.

पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचं जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

सांगलीतील कवठेपिरान रोड येथील फार्म हाऊसवर स्मृती आणि पलाश मूछल यांचा विवाह सोळला पार पडणार आहे.