
साप हा असा प्राणी आहे, ज्याला सगळेच घाबरतात. त्याने दंश केला तर आपले प्राण जातील, अशी प्रत्येकालाच भीती वाटते. त्यामुळेच साप दिसला की सगळेच दूर पळतात.

सापाला काही गंध फारच आवडतात. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास या वस्तूंचा गंध असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी. कारण सापाला हा गंध आला की साप त्या भागात येतो, असे म्हटले जाते.

उंदीर हा सापाचे आवडते खाद्य आहे. साप उंदराची शिकार करतो. त्यामुळेच उंदराची विष्ठा आणि लघवीचा वास आला की त्या भागात उंदीर असल्याचे सापाला समजते. त्यामुळेच तुमच्या घरात घरातील उंदरांना अगोदर घरातून पळवून लावले पाहिजे.

अंड्यांचा वास सापाला आकर्षित करतो. पक्ष्यांचे, कोंबडीचे अंडे सापाला खायला आवडते. त्यामुळेच ज्या भागात अशा प्रकारची अंडी सापडली असतील तर तो भाग अगोदर स्वच्छ करून घ्यावा. म्हणजे साप येण्याची शक्यता कमी होते.

सडलेला कचरा आणि खत याचा वास सापाला आवडतो. त्यामुळे तुम्ही राहता त्या भागात सडलेला कचरा आणि खताचा ढिगारा असेल तर तो लगेच साफ करा. म्हणजे साप येण्याची शक्यता कमी होते.

(टीप- ही स्टोरी इंटरनेटवरील प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)