
साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. साधा परिसरात जरी कुठे साप आढळला तर आपली चांगलीच धावपळ उडते.घरात निघाला तर मग विचारूच नका.

आपल्याला सापाची भीती वाटते, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सापांबाबत आपल्या मनात असलेल्या अनेक गैरसमजुती. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो. साप हा आपला बदला घेतोच वगैरे वगैरे.

मात्र एक लक्षात ठेवा साप हा कधीही आपला बदला घेत नाही. तसेच जगातील प्रत्येक साप हा विषारी नसतो. भारतामध्ये सापाच्या ज्या जाती आढळतात त्यातील केवळ 17 टक्के साप हे विषारी आहेत.तर 83 टक्के सापाच्या जाती या बिनविषारी आहेत.

विषारी सापांमध्ये बिग 4 चा समावेश होतो, ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि इंडियन कोब्रा या प्रमुख चार जाती आहेत. कोब्रा अर्थात नाग हा फणा काढत असल्यामुळे तो ओळखायला सोपा असतो.

त्यामुळे तुमच्या घरात जर साप निघाला तर अशावेळी न घाबरता सर्प मित्राला याची माहिती द्यावी, ते सापला पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील.

आता तुम्हाला जर असं कोणी सांगितलं तर? की भारतामध्ये असंही एक राज्य आहे जिथे सापच आढळत नाही तर? तुमचाही विश्वास नाही बसणार ना? पण भारतामध्ये देखील असा एक भाग आहे जिथे सापच आढळत नाही.

त्याचं उत्तर आहे, लक्षद्वीप.लक्षद्वीप हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप हा असा एकमेव भाग आहे जिथे तुम्हाला साप चुकूनही दिसणार नाही, औषधाला देखील साप आढळणार नाही. टीप- वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही ९ दुजोरा देत नाही.