बायकोचं बँक बॅलेन्स पाहून बांदेकरांच्या मुलाला धक्काच बसला; म्हणाला, मी हिच्याकडे नोकरी करतो..
Soham Bandekar Pooja Birari: अभिनेत्री पूजा बिरारी आणि निर्माता सोहम बांदेकर यांच्या लग्नाला अवघे काहीच महिने उलटले आहेत, आता सोहमनने पूजाबद्दल एक विधान केले आहे.

पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या एका मुलाखतीची चर्चा सुरु आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले आहे. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र मुलाखती दिल्या होत्या. यातच त्यांनी नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली आहे.
बांदेकर कुटुंबामध्ये सण उत्सवानिमित्त घरात जल्लोष असतो. Its Majja Marathiला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या लक्ष्मीबद्दल बोलताना सोहम बांदेकर म्हणाला की, 'पूजा खऱ्या अर्थाने लक्ष्मीच आहे. बऱ्याचदा अगदीच प्रवासात पैशांची गरज भासते तेव्हा, हक्काने मी तिच्याकडे पैसे मागतो. "
"मध्यंतरी, मला पूजाने तिच्या फोनमधून ओटीपी किंवा काहीतरी मेसेज बघायला लावला होता. मला तेव्हा तिचा बँक बॅलेन्स दिसला. तेव्हा माझं असं झालं की, अरे यार मी तर हिच्याकडेच नोकरी करायला हवी." असं सोहम गंमतीत म्हणाला.
पुढे सोहम म्हणतो की," या एक ते दीड वर्षात मला तिने खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. खूप काही गोष्टी तिने माझ्यासाठी अॅडजस्ट केल्या आहेत. तिच्यासाठी वेळेचं खूप महत्त्व आहे. पण ती गोष्ट तिने माझ्यावर कधीच लादली नाही. "
"अगदी हात धरुन मला तिने शिकवलं, माझा प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. लग्नाच्या 1 ते दीड वर्षात तिच्यातील संयम आणखी वाढला आहे. तो तिने अजूनही वाढवावा. असंच तिला सपोर्ट करत राहिन. छानरित्या एकत्र सण साजरे करु." असं सोहम बांदेकर म्हणाला.