थिएटरमध्ये फ्लॉप पण OTT वर टॉप ट्रेंडिंगमध्ये हा चित्रपट; 150 कोटींचं होतं बजेट

या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कुमार अरोराने केलं आहे. थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो पाहू शकता. यामध्ये अजय देवगणची मुख्य भूमिका आहे.

| Updated on: Oct 01, 2025 | 11:54 AM
1 / 5
यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला एक चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतोय. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होतोय. ओटीटीवर येताच हा चित्रपट टॉप ट्रेंडिंग यादीत पोहोचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या चित्रपटाचं नाव आहे 'सन ऑफ सरदार'.

2 / 5
'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर मृणाल ठाकूर, रवी किशन, रोशनी वालिया, विंदू दारा सिंग, दीपक डोबरियाल, कुब्रा सैत, संजय मिश्रा, चंकी पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

3 / 5
'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची बरीच चर्चा होती. परंतु प्रेक्षकांकडून त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता. समिक्षकांनीही या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला होता. आता नेटफ्लिक्सवरील टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपट आणि सीरिजच्या यादीत 'सन ऑफ सरदार 2' पोहोचला आहे.

4 / 5
अजय देवगणचा हा चित्रपट देशभरात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिला भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यामुळे सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. परंतु कथा कमकुवत असल्याने हा सीक्वेल फसला.

5 / 5
'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटाचा बजेट तब्बल 150 कोटी रुपये होता. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात या चित्रपटाने 43.24 कोटी रुपयांची कमाई केली. तर देशभरात या चित्रपटाने 60.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.