सगळं ठरलं अन् अचानक सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं, कारण ऐकून प्रत्येकजण संतप्त

आधी निवड केली, सगळं ठरलं, तिने तयारी देखील केली पण अचानक मराठीमधील सौंदर्य क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीला वयामुळे हिंदी प्रोजेक्टमधून काढलं.

| Updated on: Mar 02, 2026 | 1:28 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत नुकतेच भाष्य केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत नुकतेच भाष्य केले आहे.

2 / 5

एका हिंदी ओटीटी शोसाठी तिची निवड झाल्यानंतर अचानक तिला प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आल्याचे तिने सांगितले.

3 / 5

सोनालीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संबंधित शोसाठी तिची निर्माते-दिग्दर्शकांसोबत बैठक झाली होती. भूमिका, फी आणि शूटिंगच्या तारखा याबाबतही चर्चा पूर्ण झाली होती. तिला स्क्रिप्ट देण्यात आली होती आणि तिने तयारीही सुरू केली होती.

4 / 5

मात्र नंतर अचानक तिला कळवण्यात आले की चॅनेलने दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. यामागचे कारण विचारल्यावर तिला सांगण्यात आले की, 'सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लोकप्रियता यांसोबतच ती वयानं मोठी दिसते असे मत व्यक्त करण्यात आले.

5 / 5

यावर सोनालीने स्पष्ट केले की ती त्या भूमिकेच्या वयोगटातच आहे आणि तिचा लूक भूमिकेच्या गरजेनुसार होता. हा निर्णय चॅनेलचा असल्याचे सांगण्यात आल्यावर सोनालीने वाद न घालता विषय तिथेच संपवला. मात्र, या निकषांबाबत तिने नाराजी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us