Sonali Bendre : झुमका, लेहेंगा अन्…, नातेवाईकांच्या लग्नात सोनाली बेंद्रेचा पारंपरिक लूक ठरेल बेस्ट
Sonali Bendre : आता लग्न सराई सुरु झाली आहे. अशात जवळच्या नातेवाईकांच्या किंवा भाऊ - बहिणीच्या लग्नात कोणता लूक करायचा हा प्रश्न सर्वच तरुणींना पडतो. तर तुम्ही सोनाली बेंद्रे हिचा हा पारंपरिक लूक नक्कीच फॉलो करु शकता. सध्या सोशल मीडियावर अभिनेजत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्र हिची क्रेझ चाहत्यांमध्ये अद्यापही कायम आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोनाली आणि सिनेमांमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कळणारच नाही की, सोनाली 51 वर्षांची आहे. सोनालीचा हा लूक तुम्ही कोणत्या पारंपरिक कार्यकमासाठी कॅरी करू शकता. सोनाली हिचा हा लूक सर्वांनाच आवडला आहे.
रॉयल आणि क्लासी फोटो पोस्ट करत सोनाली कॅप्शनमध्ये म्हणतेय 'झुमका, लेहेंगा आणि थोडी जादू...', असं लिहिलं आहे. अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.
सोनाली हिने 'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांमध्ये अभिनेत्री कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.