सोनाली बेंद्रेचे आलिशान घर, आतून खूपच सुंदर; काळ्या रंगाच्या भिंतीपासून ते चांदीचं देवघर सगळंच युनिक

फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनलवर सोनाली बेंद्रेच्या घराचा एक आकर्षक व्लॉग दाखवला आहे. यात सोनालीच्या घराची विशेष सजावट, काळ्या रंगाच्या भिंती, चांदीचा देव्हार, आणि आलिशान डायनिंग असं सगळं दाखवण्यात आलं आहे.

| Updated on: May 31, 2025 | 1:25 PM
1 / 8
डायनिंग एरिआ: हे सोनाली बेंद्रेच्या घराचा डायनिंग एरिआ आहे. या ठिकाणी पांढऱ्या आणि राखाडी रंगांचा उत्तम वापर करण्यात आला आहे. सुंदर डिझाइन केलेल्या खुर्च्या आहेत आणि टेबलाच्या मध्यभागी एक सुंदर मेणबत्ती स्टँड ठेवला आहे जो त्याचे सौंदर्य वाढवतो.

2 / 8
स्वयंपाकघर: हे सोनाली बेंद्रेच्या घराचे स्वयंपाकघर आहे. तथापि, अभिनेत्री क्वचितच स्वयंपाक करते. तिचा स्वयंपाकी लक्ष्मण स्वयंपाकघराची नक्कीच काळजी घेतो. ही अभिनेत्री महाराष्ट्रीयन आहे पण तिच्या घरी बहुतेक करून पंजाबी जेवण बनवलं जातं.

3 / 8
सजावट: सोनालीच्या घराचा हा एक सुंदर भाग आहे तो म्हणजे चांदीचे देवघर. हा भाग अतिशय वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. तसेच हा भाग घराच्या बाल्कनीशीही जोडलेला आहे. जो  पाहायला आणि अनुभवायला फार सुंदर वाटतो.

4 / 8
एंट्रेंस एरिया: घराचा एंट्रेंस एरिया म्हणजे प्रवेशद्वारानंतरचा हा भाग. एंट्रेंस एरियातील भिंत ही चक्क काळ्या रंगाने रंगवलेली असून काही सुंदर पेंटींगने ती सजवलेली दिसत आहे. तसेच तिथे दोन खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत जिथे अभिनेत्री अनेकदा विश्रांती घेते.

5 / 8
लिविंग एरिया: हा सोनाली बेंद्रेचा घरातील लिविंग एरिया आहे. या भागाच्या दोन्ही बाजूला पांढरे पारदर्शक आणि आकर्षक असे पडदे लावण्यात आले आहेत. भिंतींवर काही चित्रेही लावण्यात आलेली दिसतात. अनेक ठिकाणी सुंदर मोठे वास म्हणजे फुलदाण्या ठेवण्यात आल्या आहेत.

6 / 8
हॉल: हा घराचा दुसरा भाग आहे. फराह खानच्या मते, येथे अनेकदा पार्ट्या होतात, हा परिसर सुंदर सोफ्यांनी सजवलेला आहे. एक साधे लाकडी टेबल जे या एरियाला आणखी सुंदर बनवते.

7 / 8
 टीव्ही रूम: ही सोनाली बेंद्रेची टीव्ही रूम आहे. पण या रुममध्ये टीव्हीसोबतच पुस्कांचे कपाटही दिसत आहे. तिला पुस्तके वाचायला खूप आवडतात. म्हणून या भागात ती कमी टीव्ही पाहते आणि जास्त पुस्तके जास्त वाचते.

8 / 8
 फराह खानसोबत दावत: फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनलवर सोनालीचे घर दाखवणारा हा व्लॉग शेअर केला आहे. इथे सोनाली फराहच्या खास फिश फ्रायचा आस्वाद घेतानाही दिसत आहे.