T20 WC 2026 : या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका एकमेव टीम ज्यांच्यासोबत अशी घटना नाही घडली, टीम इंडिया लिस्टमध्ये टॉपवर
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान एक हैराण करुन सोडणारा आकडा समोर आलाय. एका नको त्या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिका सोडून सर्व टीम्स आहेत. या लिस्टमध्ये भारतीय टीम टॉपवर आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्य एकूण 20 टीम सहभागी झाल्या आहेत. यात आठ टीम्सनी दुसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय केलय. या दरम्यान एक इंटरेस्टिंग आकडा समोर आलाय. त्याने प्रत्येकजण हैराण आहे. एक असा आकडा ज्यामुळे दक्षिण आफ्रिका इतर टीम्स पेक्षा वेगळी ठरते. (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये चार सामने जिंकले आहेत. ग्रुपमध्ये टॉप करुन सुपर-8 मध्ये आले आहेत. त्यांच्या फलंदाजीच्या लाइन अपमध्ये क्विंटन डी कॉक, रेयान रिकलटन, एडेन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स सारखे खेळाडू सतत धावा बनवतायत. आता सुपर-8 मध्ये त्यांचा सामना भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे विरुद्ध होईल. (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण आफ्रिका 2026 टी20 वर्ल्ड कपमधील अशी एकमेव टीम आहे, ज्यांचा एकही फलंदाज अजूनपर्यंत शुन्यावर आऊट झालेला नाही. अन्य टीम्सचे फलंदाज एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ डक वर आऊट झालेत. हेच दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं वेगळेपण आहे. (PHOTO CREDIT- PTI)

दुसरीकडे टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाच्या नावावर एका नको असलेल्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. टुर्नामेंटमध्ये भारत आणि इटलीच्या नावावर आतापर्यंत 8-8 डक आहेत. जे सर्व 20 टीम्समध्ये सर्वाधिक आहेत. याचं सर्वात मोठं कारण भारतीय ओपनर अभिषेक शर्माचा खराब फॉर्म आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अभिषेक शर्मा टुर्नामेंटमध्ये सलग तीनदा शुन्यावर आऊट झालाय. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध खात न उघडाताच आऊट झाला. टीम इंडियासाठी हा चितेंचा विषय आहे. अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट होणारा फलंदाज आहे. (PHOTO CREDIT- PTI)