
मनोरंजन विश्वातील प्रसिध्द जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्न करणार आहेत.

या दोघांसाठी सिनेविश्वातील त्यांच्या सहकलाकार, मित्र-मंडळींकडून खास केळवणाचे आयोजन करण्यात येत आहे.

आता अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षितीनं या दोघांसाठी खास केळवण ठेवलं आहे.

'पाटलांच्या घरचं जेवण काही औरच. खूप टिप्स आणि गायडन्स ने भरलेलं केळवण'असं कॅप्शन देत सिद्धार्थनं हे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सध्या सिद्धार्थ आणि मितालीची जोडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यात त्यांचे केळवणाचे फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहेत.