एक बायको दोन पती! या ठिकाणी सगळे भाऊ करतात एकाच मुलीसोबत लग्न, गजब लग्नाची प्रथा माहिती आहे का?

सध्या एका विवाहपद्धतीची सगळीकडे चर्चा होत आहे. या विवाहात एका मुलीसोबत एका कुटुंबातील सर्व भाऊ लग्न करतात. विशेष म्हणजे अशा प्रकारचे विवाह हे सहमतीने केले जातात.

| Updated on: Feb 15, 2026 | 6:06 PM
1 / 5
भारतात असे एक ठिकाण आहे जिथे कुटुंबातील सर्व भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करतात. हिमालय क्षेत्रात अशी परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा नेमकी काय आहे? या परंपरेमागे नेमकं काय कारण आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या...

2 / 5
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स गिरी परिसरात दोन भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केलं होतं. तेथील प्रथा-परंपरांचे पालन करून हा विवाह सोहळा पार पडला होता. विशेष म्हणजे दोन भाऊ आणि एका मुलीने परस्पर सहमतीने हे लग्न केले होते.

3 / 5
हिमाचल प्रदेशमधील हट्टा या जनजातीमध्ये हा अशा प्रकारचे ववाह आजही होतात. या भागात अशा प्रकारच्या विवाहाला जजदा विवाह म्हणून ओळखले जाते. हिमाचल प्रदेशमधील सिरमौर या जिल्ह्याव्यतिरिक्त उत्तराखंडमधील जौनसार बावर आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर क्षेत्रात असे विवाह होतात.

4 / 5
परंत 70 ते 80 च्या दशकानंतर अशा प्रकारच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शेतीसाठी असलेली कमी जमीन  आणि वडिलांच्या संपत्तीची वाटणी होऊ नये म्हणूनही हे लग्न केले जाते. असे लग्न झाल्यावर नवऱ्या मुलाकडचे सर्व कुटुंबीय मुलीची जबाबदारी घेतात.

5 / 5
अशा लग्नात कायदेशीररित्या मोठ्या भावाला मुलाचे वडील मानले जाते. या भागातील प्रौढ आणि वयस्कांच्या मतानुसार अशा प्रकारचे विवाह हे सहमतीने होतात. परंतु अशा विवाहांची संख्या खूपच कमी आहे. लग्नाचे असे प्रकार मात्र खूपच कमी प्रमाणात सार्वजनिक होतात.