AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office च्या 9 शानदार योजना, पाहा किती दिवसात पैसे होतात डबल ?

Investment in Post Office Saving Scheme: कोणत्या स्कीममध्ये किती दिवस पैसे गुंतवल्यास पैसे डबल होतील हे जाणण्यासाठी तुम्हाला एक युनिव्हर्सल फॉर्म्युला वापरायचा आहे. या फॉर्म्युल्याला Formula 72 म्हटले जाते.

Post Office च्या 9 शानदार योजना, पाहा किती दिवसात पैसे होतात डबल ?
post-office-investment
| Updated on: May 26, 2026 | 4:30 PM
Share

Post Office Saving Scheme: बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे.तुम्ही नोकरी करत असाल,एखादा बिझनस करत असाल, शेती वा अन्य काम तुमच्या कमाईतून काही रक्कम बचत करणे एक चांगली सवय आहे.बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करणे देखील गरजेचे असते. जेव्हा गोष्ट सुरक्षित गुंतवणूकीची असते तेव्हा पोस्ट ऑफीसच्या योजनांना सर्वात चांगले मानले जाते.

Post Office मध्ये तुमची बचत, गरज आणि उद्देश्याच्या हिशेबाने अनेक प्रकारच्या Schemes चालवल्या जातात. या योजना सुरक्षेसोबत चांगला परताव्याची गॅरंटी देखील देतात. आपण जर पोस्ट ऑफीसच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक केली असेल किंवा करु इच्छीता. तर तुम्हाला माहिती आहे की किती दिवसा तुमचे पैसे डबल होतील ?

1. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit)

या योजनेत पोस्ट ऑफीस १ ते ३ वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर ५.५ टक्के व्याज दर देत आहे. या व्याज दराला ७२ ला भागले तर उत्तर १३.०९ येते. याचा अर्थ जर कोणी या योजनेत पैसे लावले तर सुमारे १३ वर्षानंतर त्याचे पैसे डबल होतील. तसेच पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर पोस्ट ऑफीस ६.७ टक्के व्याज ऑफर करत आहे. यात तुमचा पैसा १०.७४ म्हणजे सुमारे पावणे ११ वर्षात ( १० वर्षे,९ महिने ) डबल होईल.

2. आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit)

पोस्ट ऑफिसची आरडी स्कीममध्ये या ५.८ टक्के व्याज दर मिळत आहे. या स्कीममध्ये पैसे लावल्यानंतर १२ वर्षे ५ महिन्यात तुमचे पैसे डबल होतील.

3. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम (Post Office Saving Scheme)

पोस्टाच्या या सेव्हिंग स्कीममध्ये ४.४ टक्के व्याज मिळते. ही खूप विश्वासार्ह योजना आहे. या योजनेत जर कोणी गुंतवणूक करत असेल तर सुमारे १८ वर्षानंतर त्यांच्या पैसा डबल होईल.

4. मासिक इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme)

पोस्ट ऑफीसच्या मासिक इन्कम स्कीममध्ये या वेळी ६.६ टक्के व्याज मिळत आहे. या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा पैसा १०.९१ म्हणजे सुमारे ११ वर्षात डबल होऊन जाईल.

5. सिनियर सिटीझन स्कीम (Post Office Senior Citizen Scheme)

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम मध्ये साधारण ७.४ टक्के व्याज मिळते. या योजनेत जर का एखाद्या सिनियर सिटीझन इन्वेस्टमेंट करत असेल तर त्याचा पैसा ९.७३ वर्षात डबल होऊन

6. पीपीएफ स्कीम (Post Office PPF Scheme)

पीपीएफ म्हणजे Public Provident Fund scheme ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट स्की आहे. या योजनेत साधारण ७.१ टक्के व्याज मिळत आहे. या स्कीममध्ये पैस लावण्यास १०.१४ वर्षात रक्कम दुप्पट होईल.

7. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना लोकांना आकर्षित करत आहे. मुलींच्या भविष्यासाठी सुरु असलेल्या या योजनेत सुमारे ७.६ टक्के व्याज मिळते. जर यात कोणी गुंतवणूक केल्यास ९ वर्षे ६ महिन्यात त्याचे पैसे डबल होतीस.

8. नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट (National Saving Certificate)

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट स्कीमवर देखील चांगला परतावा मिळत आहे. या स्कीममध्ये ६.८ टक्के व्याज मिळते. या रेटच्या हिशेवाने सुमारे १० वर्षे ७ महिन्यात तुमचे पैसे डबल होतील.

9. किसान विकास पत्र (Post Office KVP Scheme)

नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट सारखा या किसान विकास पत्राच्या योजनेत चांगला परतावा मिळत आहे.यात ६.९ टक्के व्याज मिळत आहे. या हिशेबाने येथे १२४ महिने म्हणजे १० वर्षे ४ महिन्यात पैसे डबल होतील. यात किमान १००० रुपयांपासून पैसे गुंतवू शकता. कमाल गुंतवणूकीसाठी कोणतीही सीमा नाही.

Follow Us
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात.
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल.
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी.
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे.
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी...