
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-2 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका गमावली पण नकोसा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ मिचेल मार्श याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेला होता. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यात 3 विकेट विजय मिळवला. दुसऱ्या 123 धावांनी विजय मिळवला. पण पुढच्या तीन सामन्यात सर्वच चित्र बदलून गेलं.

तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 111 धावांनी, चौथ्या वनडे सामन्यात 164 धावांनी आणि पाचव्या वनडे सामन्यात 122 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिका 3-2 ने खिशात घातली.

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला सलग तीन सामन्यात 100 हून अधिका धावांनी पराभूत केलं. वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ असून सलग तीन सामन्यात 100 हून अधिक धावांनी पराभव सहन करावा लागला आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला 100 हून अधिक धावांनी पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला स्फुरण मिळालं आहे. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कशी कामगिरी असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानासाठी लढत होणार आहे. सध्या भारत दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. (All Photo Source : Twitter)