Cricket : नाईट रायडर्समध्ये पाकिस्तानच्या दोघांची एन्ट्री, शाहरुखच्या टीमकडून संधी

भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे शेजारी देशातील खेळाडूंवर आयपीएल स्पर्धेत बंदी घातली गेली आहे. मात्र आयपीएल फ्रँचायजीच्या मालकाने पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jun 19, 2025 | 10:54 AM
1 / 5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद केले. मात्र अशात शाहरुख खान याच्या एका संघात 2 पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
ट्रिनबागो नाईट रायडर्स ही टीम शाहरुख खानच्या मालकिची आहे. वेस्ट इंडिजमधील टी 20 कॅरेबियन लीगमधील ट्रिनबागो नाईट रायडर्स ही महत्त्वाची टीम आहे. टीकेआरने सीपीएल 2025 आधी टीम जाहीर केलीय. या संघात 2 पाकिस्तान खेळाडूंचा समावेश आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
या 2 पाकिस्तानी खेळाडूंमध्ये माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि स्पिनर उस्मान तारीक यांचा समावेश आहे. टीकेआरने या दोन्ही खेळाडूंना नव्या हंगामासाठी विदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केलं आहे. पाकिस्तानच्या या दोघांची या टीमकडून खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. (Photo: Getty Images & PCB)

4 / 5
मात्र हे दोघे खेळाडू सीपीएलमध्येच  नाईट रायडर्ससाठी खेळणार आहेत. त्यामुळे या दोघांवरही आयपीएलमध्ये बंदी कायम असणार आहे. दरम्यान कोणत्या भारतीय फ्रँचायजीने पाकिस्तानी खेळाडूंसह करार करण्याची ही काही पहिली वेळ नाही. (Photo: Getty Images)

5 / 5
टीकेआर टीममध्ये एकसेएक आणि विस्फोटक फलंदाज आहेत. या टीममध्ये कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि एलेक्स हेल्स यासारखे अनेक स्फोटक फलंदाज आहेत. सीपीएलच्या 13 व्या मोसमाला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. (Photo: Getty Images)