PHOTOS : कर्णधार श्रेयस पाठोपाठ दिल्लीचा संघही UAE मध्ये दाखल, उर्वरीत IPL खेळण्यासाठी सज्ज

आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत सीजनला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी एक एक संघ युएईमध्ये दाखल होत आहे. सर्वात आधी चेन्नई सुपरकिंगनंतर मुंबईचा संघ युएईत दाखल झाला होता. आता कर्णधार श्रेयस अय्यर पाठोपाठ दिल्लीची टोळीही दुबईत पोहोचली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 6:21 PM
1 / 5
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि  मुंबई इंडियन्स (MI) पाठोपाठ आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyyer) कर्णधार असलेली दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीमही यूएईसाठी रवाना झाली आहे. संघाती खेळाडूंसह काही अधिकारी विमानाने दुबईसाठी रवाना झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) पाठोपाठ आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyyer) कर्णधार असलेली दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीमही यूएईसाठी रवाना झाली आहे. संघाती खेळाडूंसह काही अधिकारी विमानाने दुबईसाठी रवाना झाले आहेत.

2 / 5

दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकत संघ दुबईला रवाना झाल्याची माहिती दिली. दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन सदस्य दिल्लीला जात असून संपूर्ण सुरक्षेसह पीपीईकिटमध्ये खेळाडू दिसत आहेत. या पोस्टला, 'पुन्हा भरतोय उड्डान 2.0,' असं कॅप्शन देत युएईला जात असल्याचं सांगितलं आहे.

3 / 5

संघाचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्राने विमानतळावर पीपीई किटमधील एक फोटो पोस्ट केला आहे. 'दुबईकडे जाताना' असं कॅप्शनही दिलं आहे. संघातील परदेशी खेळाडू अजून दुबईला पोहोचलेले नाहीत.

4 / 5

दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व श्रेयस अय्यर करणार आहे. आतापर्यंच आठ सामन्यात 12 गुणांसह दिल्लीचा संघ अव्वल स्थानी असून 22 सप्टेंबर रोजी सनरायजर्स हैद्राबाद संघाशी भिडेल.

5 / 5

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आधीच दुबईला पोहोचला आहे. सहप्रशिक्षक प्रवीण आमरेसह श्रेयस दुबईत आधीच गेला असून त्याने आपले काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us