
सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाने कमालीच पुनरागमन केलं. भारतीय टीमने केपटाऊन टेस्ट अवघ्या 2 दिवसात 7 विकेटने जिंकली. या विजयाशिवाय रोहित शर्मा जे बोलला त्याची चर्चा आहे.

केपटाऊन टेस्ट चेंडूच्या हिशोबाने खूप लवकर संपली. टीम इंडियाने ही टेस्ट मॅच फक्त 642 चेंडूत जिंकली.

केपटाऊनमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदा या मैदानावर टेस्ट मॅच जिंकलीय. केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारी टीम इंडिया पहिली आशियाई टीम आहे.

रोहित शर्माला केपटाऊन टेस्टच्या पीचबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्याने सांगितलं की, "भारतातील खेळपट्टयांबद्दल तोंड बंद ठेवणार असतील, तर अशा प्रकारच्या पीचवर खेळण्यात मला काही अडचण नाहीय. लोक भारतातील खेळपट्ट्यांची तक्रार करतात"

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या पीचच आव्हान स्वीकारण्यात काहीही अडचण नाहीय. पण भारतातील पीचवर दुसऱ्या टीम्सनाही आव्हानच मिळेल. त्यावेळी त्यांना गप्प बसावच लागेल असं रोहित शर्मा म्हणाला.