वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अनाया बांगर थेट मैदानात, फोटो शेअर करत म्हणाली…

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली असून जेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. असं असताना क्रिकेटपटू अनाया बांगरने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात हजेरी लावली. याबाबत तिने एक पोस्ट केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

| Updated on: Oct 24, 2025 | 5:10 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली आहे. जेतेपदापासून टीम इंडिया दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत त्यांना लोळवलं. या सामन्यावेळी अनाया बांगर मैदानात उपस्थित होती. (Photo- Instagram)

2 / 5
भारत न्यूझीलंड सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी अनाया बांगर स्टेडियममध्ये गेली होती. यावेळी तिने भारतीय महिला संघाला प्रोत्साहन दिलं. (Photo- Instagram)

3 / 5
लिंग बदलल्यानंतर अनाया बांगर पहिल्यांदाच भारतीय महिला संघाचा सामना पाहण्यासाठी मैदानात गेली होती. यापूर्वी आर्यन बांगर म्हणून तिची एक क्रिकेटपटू म्हणून ओळख होती. अंडर 19 पातळीवर अनायाने सरफराज खान आणि यशस्वी जयस्वालसोबत क्रिकेट खेळलं आहे. (Photo- Instagram)

4 / 5
अनया बांगरने यापूर्वीही महिला क्रिकेटमधून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने बीसीसीआय, आयसीसीला पत्रही लिहिलं आहे. मात्र त्याबाबत अजूनतरी काही उत्तर आलेलं नाही. दरम्यान, तिने डीवाय पाटील स्टेडियमचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. (Photo- Instagram)

5 / 5
अनया बांगर महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2024 च्या महिला टी20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत डॅनिएल मॅकगीचं नाव चर्चेत आलं होतं. लिंग बदल केल्यानंतर तिने कॅनडासाठी सहा सामने खेळले होते. पण त्यानंतर आयसीसीने नियमात बदल केले. (Photo- Instagram)