
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 27 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 389 धावा दिल्या होत्या. पण न्यूझीलंडचा संघ 50 षटकात 383 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 धावांनी जिंकला.

रचिन रविंद्र याने या सामन्यात 89 चेंडूत 116 धावांची वादळी खेळी केली. यात 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. रचिन रविंद्र याने शतकी खेळीसह स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.

23 वर्षीय रचिनने न्यूझीलंडकडून खेळताना वर्ल्डकपच्या एकाच पर्वात दोन शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. तसेच यापूर्वी हा विक्रम त्याच्या नावावर होता.

रचिन रविंद्र याने 5 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध नाबाद 123 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याने 82 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. 23 दिवसानंतर त्याने आपला विक्रम मोडला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रचिन रविंद्र याने 89 चेंडूत 116 धावा केल्या. पण 77 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि आपला रेकॉर्ड मोडला.

कमी डावात दोन शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रचिन पाचव्या स्थानावर आहे. यात ग्लेन टर्नर पहिल्या स्थानावर आहे. त्याने 3 डावात दोन शतकं ठोकली होती. तर राहुल द्रविड 4, ज्योफ मार्श 5, शिखर धवन 5 आणि रचिन रविंद्र याने 6 डावात दोन शतकं ठोकली आहेत.