
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शाह यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एसीसीच्या वार्षिक बैठकीत कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

जय शाह यांच्या खांद्यावर आणि एका वर्षाची जबाबदारी पडली आहे. एसीसीकडून सांगण्यात आलं की, "जय शाह यांच्या कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी दिला होता."

जय शाह जानेवारी 2021 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले होते. यापूर्वी ही जबाबदारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्याकडे होती. त्यांच्याकडून ही जबाबदारी जय शाहांकडे आली होती.

जय शाह यांचा कार्यकाळ वाढवताच एका विक्रमाची नोंद झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून फेरनियुक्त झालेले सर्वात कमी वयाचे अध्यक्ष आहेत. तसेच सलग दुसऱ्या कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

जय शाह यांनी सांगितलं की, "मी एसीसीचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी पुढच्या कार्यकाळात आणखी जोमाने काम करेल. खेळासोबत एसीसी मंडळ सदस्यासोबत खेळीमेळीचं वातावरण राहील यासाठी प्रयत्नशील राहीन

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वाने सांगितलं की, 'जय शाह आशियाई क्रिकेट आणखी प्रभावी होण्यासाठी पावलं उचलत आहेत.'