IPL 2026 स्पर्धेत खेळण्यास नकार! आता द्विशतक ठोकून दिल्ली कॅपिटल्सला दाखवली पॉवर

Nottinghamshire vs Surrey: काउंटी चॅम्पियनशिपच्या 23व्या सामन्यात नॉटिंघमशर आणि सरे यांच्यात आमनासामना झाला. हा सामना ड्रॉ झाला पण या सामन्यात डावखुऱ्या बेन डकेट्सने द्विशतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डकेटने नाबाद 203 धावांची खेळी केली.

| Updated on: May 12, 2026 | 3:43 PM
1 / 5
Ben Duckett Double Century:  बेन डकेटने आयपीएल 2026 स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आणि आपलं नाव मागे घेतलं. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला धावाधाव करावी लागली. पण बेन डकेट पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. बेन डकेटने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉटिंघमशरसाठी खेळताना द्विशतक ठोकलं. (PC-PTI)

2 / 5
बेन डकेटने दुसर्‍या डावात नाबाद 203 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे नॉटिंघमशरचा संघ 414 धावांपर्यंत पोहोचला आणि हा सामना ड्रॉ झाला. डकेटने आपल्या डावात 23 चौकार आणि एक षटकार मारला. (PC-PTI)

3 / 5
बेन डकेटने पहिल्या डावातही चांगली कामगिरी केली होती. पण त्याचं अर्धशतक हुकलं होतं. त्याने 59 चेंडूत 42 धावांची खेळी केली. पण वॉरेलच्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि स्मिथच्या हातात झेल गेला. (PC-PTI)

4 / 5
बेन डकेटने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 31 शतकं ठोकली आहेत. त्यात त्याने 12 हजाराहून अधिक धावा केल्या आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 282 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. (PC-PTI)

5 / 5
बेन डकेटकडे आयपीएल 2026 स्पर्धेत खेळण्याची संधी होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2 कोटीच्या बेस प्राइसवर खरेदी केलं होतं. पण त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. बेन डकेटने माघार घेताना सांगितलं की, इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायचं आहे. यासाठी मेहनत करत आहे. पण त्याच्या या निर्णयानंतर आयपीएल स्पर्धेत त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. (PC-PTI)

Follow Us