
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनल दक्षिण अफ्रिकेने जिंकली. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरु झालं आहे. या महिन्यात 8 संघ 4 कसोटी सामने खेळतील. या 4 मालिकांमध्ये टीम इंडियाचा देखील सहभा आहे. म्हणजेच, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मालिकेची सुरुवात करेल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश: श्रीलंका आणि बांगलादेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. श्रीलंकेतील गॅले येथे या मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या मालिकेत बांगलादेश-श्रीलंका एकूण दोन कसोटी सामने खेळणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळले जातील. शुक्रवारी होणारा पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर होणार आहे आणि शुबमन गिल या सामन्याद्वारे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करेल.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया: वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 25 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे होणार आहे आणि या मालिकेत दोन्ही संघ एकूण 3 कसोटी सामने खेळतील.

झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका: जागतिक कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका 28 जून रोजी झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळणार आहे. झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या या कसोटी मालिकेत एकूण 2 सामने खेळवले जातील. त्यानुसार, जूनच्या अखेरीस एकूण 8 संघ कसोटी मालिका सुरू करतील. पण हा सामना वर्ल्ड टेस्ट कसोटीचा भाग नसेल. कारण झिम्बाब्वे हा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही.