ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘गुड न्यूज’ने तोडले इन्स्टाग्रामचे सर्व रेकॉर्ड्स, ‘या’ फोटोवर पडला लाईक्सचा पाऊस

ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सध्या जागतिक फुटबॉलमधील सर्वोत्कष्ट खेळाडूसह एक फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखलं जात. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीवर फॅन्सची करडी नजर असते.

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 11:16 PM
1 / 4
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकतीच एक आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. रोनाल्डो लवकरत जुळ्या बाळांचा बाबा बनणार असल्याचं त्याने जाहीर केलं. त्याने गर्लफ्रेंड  जॉर्जिना रोड्रिग्ज (Georgina Rodriguez) हिच्यासोबतचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

2 / 4
रोनाल्डोने शेअर केलेल्या या फोटोला तब्बल 27.1 मिलियन म्हणजेच जवळपास दोन कोटी 71 लाखच्या घरात लाइक्स मिळाले आहेत. आतापर्यंत कोणत्याच इन्स्टा पोस्टला इतके लाईक्स मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे फॉलोवर्सही 360 मिलियन इतके आहेत.

3 / 4
रोनाल्डोने वरील फोटोसह  त्याच्या आधीच्या चार मुलांसह स्विमींग पूलमधील मजा-मस्ती करतानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

4 / 4
याआधी रोनाल्डो 2017 साली जुळ्या मुलांचा बाबा झाला बोता. एवा आणि मातियो अशी त्यांची नावं आहेत. यातील एवा मुलगी असून मातियो मुलगा आहेत. तर रोनाल्डो ज्युनियर आणि अलाना मार्टिना अशीही त्याच्या इतर मुलांची नावं आहेत.