Ravindra Jadeja याने CSK कडून 12 वर्षांत किती कमावले? जाणून घ्या आकडा

Ravindra Jadeja IPL 2026 Trade : चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला गेल्या 12 वर्षांत भरभरून दिलंय. तसेच जडेजानेही पैसावसूल कामगिरी केलीय. जडेजाने या दरम्यान किती कमाई केली? जाणून घ्या

Updated on: Nov 13, 2025 | 3:41 PM
1 / 5
आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी होणाऱ्या रिटेन्शनच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्स जडेजासाठी  इच्छूक आहे. सीएसके रवींद्र जडेजा याच्या बदल्यात संजू सॅमसन याला आपल्या गोटात घेणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 फ्रँचायजींमध्ये संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील अदलाबदलीसाठीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. रवींद्र जडेजा चेन्नईसाठी 12 वर्ष खेळला आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
जडेजाने चेन्नईला या 12 वर्षांत 3 आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. जडेजाने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच जडेजाने या 12 वर्षात रग्गड कमाई केली आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
सीएसकेने जडेजाला 2012 साली आपल्या संघात संधी दिली होती. फ्रँचायजीने जडेजासाठी तेव्हा 9.2 कोटी रुपये मोजले होते. त्यानंतर जडेजाच्या किंमतीत सातत्याने घसघशीत वाढ होत राहिली. जडेजाला 2014 साली 5.5 कोटी, 2018 साली 7 कोटी, 2022 मध्ये 16 तर 2025 साली 18 कोटी रुपये मिळाले. (Photo Credit: PTI)

5 / 5
जडेजाने चेन्नईकडून खेळताना 12 हंगामात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. जडेजाने 12 हंगामांमध्ये 123.4 कोटी रुपये कमावले आहेत. जडेजा सीएसकेकडून  दिग्गज महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू आहे. धोनीने सीएसकेकडून  192.8 कोटींची कमाई केली आहे. (Photo Credit: PTI)