
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 10 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियात वेगवान गोलंदाज दीपक चाहर याची एन्ट्री झाली आहे. (PC-TWITTER SCREENSHOT)

दीपक चाहर टीम इंडियापासून गेली अनेक महिने फिटनेसच्या समस्येमुळे दूर आहे. मात्र दीपक तिसऱ्या कसोटीआधी सराव करताना दिसला. (PC-TWITTER SCREENSHOT)

दीपक चाहर याची इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात झालेली नाही. मात्र दीपकला लॉर्ड्समध्ये सराव करण्याची संधी देण्यात आली. दीपक टीम इंडियाचा खेळाडूंसह स्ट्रेचिंग करताना दिसला. (PC-TWITTER SCREENSHOT)

दीपक चाहर लंडनमध्ये विम्बल्डन स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी गेला होता. दीपकसोबत त्याची पत्नी जया ही देखील हजर होती.या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता (PC-TWITTER SCREENSHOT)

तसेच तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल होणार असल्याचं निश्चित आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार आहे. त्यामुळे प्रसिध कृष्णा याला डच्चू दिला जाऊ शकतो. (PC-PTI)