IND vs ENG: अभिषेक शर्माचं षटकारांचं शतक, पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Abhishek Sharma World Record : भारताचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने इंग्लंड दौऱ्याची अप्रतिम सुरुवात केली. अभिषेकने पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

| Updated on: Jul 02, 2026 | 5:18 PM
1 / 5
टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. अभिषेकने फायर अर्धशतक झळकावलं. अभिषेकने या दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 5
अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 1 जुलैला चेस्टर ली स्ट्रीटमध्ये झालेल्या सामन्यात टी 20i क्रिकेटमध्ये षटकारांचा शतक पूर्ण केलं. अभिषेकने डावातील चौथ्या ओव्हरमध्ये साकीब महमुद याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकत हा कारनामा केला. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5
इंग्लंड विरूद्धच्या सामन्याआधी अभिषेकच्या नावावर टी 20i क्रिकेटमध्ये 98 षटकारांची नोंद होती. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध दुसरा षटकार लगावताच खास शतक पूर्ण केलं. अभिषेक यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 100 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 5
अभिषेकने कारकीर्दीतील 49 व्या सामन्यांत 785 चेंडूत 100 षटकार पूर्ण केले. अभिषेकने यासह वेस्ट इंडिजच्या एविन लुईस याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. एविनने 789 चेंडूत 100 टी 20i षटकार लगावले होते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 5
तसेच अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अभिषेक यासह इंग्लंडमध्ये वेगवान अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने याबाबतीत केएल राहुल याला मागे टाकलं. केएलने 2018 साली 27 चेंडूत अर्धशतक केलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Follow Us