भारताकडून दीर्घ कालावधीनंतर कसोटीत कमबॅक करणारे पाच खेळाडू, जाणून घ्या त्यांच्याबाबात

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. असं असताना या संघात 8 वर्षानंतर करूण नायरने कमबॅक केलं आहे. पण इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कमबॅक करणारा करूण नायर हा पहिला खेळाडू नाही.

| Updated on: Jun 20, 2025 | 3:33 PM
1 / 6
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हेंडिग्ले मैदानावर सुरु झाला आहे. पहिल्याच सामन्यात कर्णधार शुबमन गिलला नाणेफेकीचा कौल गमावावा लागला. त्यामुळे प्रथम फलंदाजी वाटेला आहे. शुबमन गिलने प्लेइंग 11 जाहीर करताना साई सुदर्शनचं पदार्पण आणि करूण नायरचं कमबॅक झाल्याचं सांगितलं. भारतीय संघात इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कमबॅक करणारा करुण नायर हा काही पहिला खेळाडू नाही. (फोटो- बीसीसीआय)

2 / 6
करुण नायरचं 8 वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे. यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला टीम इंडियाचं तिकीट मिळालं. इंडिया ए कडून खेळताना त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध चांगली खेळी केली होती. (फोटो- बीसीसीआय)

3 / 6
दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जयदेव उनाडकट हा सर्वात आघाडीवर आहे. त्याने 2010 मध्ये कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2022 मध्ये म्हणजेच 12 वर्षांनी खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्याच्या हातून 118 कसोटी सामने गेले. (फोटो- पीटीआय)

4 / 6
दुसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकचा नंबर लागते. त्यानेही 2010 नंतर 2018 मध्ये कसोटी सामन्यात कमबॅक केलं होतं. या दरम्यान त्याला 87 कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. (फोटो- पीटीआय)

5 / 6
पार्थिव पटेल याने 2008 नंतर थेट आठ वर्षांनी कसोटी सामना खेळला होता. त्याला 2016 मध्ये कसोटी सामा खेळण्याची संधी मिळाली होती. या आठ वर्षांच्या कालावधीत त्याला 83 कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. (फोटो- Parthiv Patel Twitter)

6 / 6
या यादीत अभिनव मुकुंद हा पाचव्या स्थानावर येतो. त्याने 2011 नंतर थेट 2017 मध्ये टीम इंडियात कमबॅक केलं होतं. यावेळी त्याला 56 कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. (Photo- Abhinav Mukund Facebook)