
आयपीएल 2025 स्पर्धेचे 61 सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून तीन संघांची वर्णी प्लेऑफमध्ये लागली आहे. तर पाच संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. तर प्लेऑफच्या एका जागेसाठी दोन संघात चुरस आहे.

आयपीएलमध्ये आधीच 12 सामने खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 9 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन सामने जिंकले आहेत. अजूनही स्पर्धेत 2 सामने खेळायचे आहेत. हे सामने जिंकले तरी चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता उर्वरित एका सामन्यात जिंकले तरी राजस्थान रॉयल्स पुढील टप्प्यात जाऊ शकणार नाही. त्यामुळे राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

सनरायझर्स हैदराबादने 12 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही.

केकेआरने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी फक्त पाच सामने जिंकले आहेत. आरसीबी विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफ मोहीमही संपली आहे. त्यामुळे शेवटचा सामना औपचारिक आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित दोन सामने जिंकले तरी लखनौ सुपरजायंट्स प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ एका स्थानासाठी स्पर्धा करत आहेत. मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यापैकी एक संघ चौथा संघ म्हणून प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. (सर्व फोटो- BCCI/IPL)