मेजर लीग स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने दणदणीत शतकासह रचला विक्रम, काय ते वाचा

मेजर लीग क्रिकेट 2025 टी20 स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने शानदार शतक ठोकून अनेक विक्रम लिहिले आहेत. रोहित शर्माच्या 8 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच विराट कोहलीचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे.

| Updated on: Jun 18, 2025 | 8:40 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मेजर लीग स्पर्धेत धमाका केला. 48 चेंडूत शतक ठोकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली.  मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत वॉशिंग्टन फ्रीडमकडून खेळणाऱ्या मॅक्सवेलने लॉस एंजेलिस नाईट रायडर्सविरुद्ध शानदार शतक ठोकले आहे.

2 / 5
फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 49 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. त्याने 13 षटकार आणि 2 चौकार मारले. या दरम्यान मॅक्सवेलने 216.33 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने टी20  क्रिकेटमध्ये 10500 धावाही पूर्ण केल्या.

3 / 5
ग्लेन मॅक्सवेल टी20 क्रिकेटमध्ये 10500हून अधिक धावा करणारा जगातील 16 वा फलंदाज ठरला. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतके झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 10500+ धावा, 150+ विकेट्स आणि 8 शतके करणारा जगातील एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

4 / 5
ग्लेन मॅक्सवेल टी20  क्रिकेटमध्ये 8 शतके करणारा जगातील सहावा फलंदाज बनला आहे. या विक्रमात विराट कोहली मॅक्सवेलच्या पुढे आहे. या यादीत किंग कोहली 9 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.जर मॅक्सवेलने आगामी सामन्यांमध्ये शतक झळकावले तर तो तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतो.

5 / 5
ग्लेन मॅक्सवेलच्या 106 धावांच्या मदतीने वॉशिंग्टन फ्रीडमने 20 षटकांत 208 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना लॉस एंजेलिस नाईट रायडर्सचा संघ 16.3 षटकांत 95 धावांवर सर्वबाद झाला. यासह वॉशिंग्टन फ्रीडमने 113 धावांनी विजय मिळवला. (सर्व फोटो- Washington Freedon Twitter)