हार्दिक पांड्याने मोडला विराट कोहलीचा विक्रम, मिळवलं नंबर एक स्थान
टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 विकेट पराभव केला. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच विराट कोहलीला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयात हार्दिक पांड्याची जबरदस्त कामगिरी राहिली. पहिल्यांदा गोलंदाजीत, नंतर फलंदाजीत कहर केला. यावेळी त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढलाय.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा षटकार मारून सामना जिंकवणारा खेळाडू ठरला आहे.

हार्दिक पांड्याने जसा तस्किन अहमदच्या चेंडूवर षटकार मारला तसा विराट कोहलीला मागे टाकत पहिल्या स्थानावर विराजमान झाला. हार्दिक पांड्या पाचव्यांदा षटकार मारून भारताला जिंकवलं आहे.

रनमशिन्स विराट कोहलीने चारवेळा षटकार मारून भारताला जिंकवलं आहे. आता या शर्यतीत हार्दिक पांड्या पुढे निघून गेला आहे.

हार्दिक पांड्याने 16 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तसेच 4 षटकं टाकत 26 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. (सर्व फोटो- बीसीसीआय आणि पीटीआय)