
आयपीएल 2025 मधील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. (Photo Credit : IPL X Account)

आयपीएल 2025 अंतिम सामन्याला आयसीसी अध्यक्ष जय शाह सपत्नीक उपस्थित आहेत. जय शाह यांच्या पत्नीचे नाव रिशीता पटेल असं आहे. जय शाह यांनी 2019 साली बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जय शाह यांनी 5 वर्ष सचिव पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2024 साली जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. (Photo Credit : Social Media)

रिशीता अहमदाबादमधील उद्योगपती गुणवंतभाई पटेल यांची कन्या आहे. रिशीता आणि जय शाह हे दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखायचे. (Photo Credit : PTI)

जय आणि रिशीता हे कॉलेजपासून मित्र होते. काही वर्षांनंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.जय शाह आणि रिशीता हे दोघे 2015 साली विवाबंधनात अडकले. जय शाह आणि रिशीता यांना 3 अपत्य आहेत. (Photo Credit : PTI)

रिशीता पटेल यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र जय शाह हे सध्या आयसीसी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहे. जय शाह यांनी याआधी बीसीसीआय सचिव, एसीसी अध्यक्ष आणि अशी अनेक पदं भूषवली आहेत. (Photo Credit : PTI)