Womens T20 World Cup : शफाली वर्मा-फातिमा सनाची खास कामगिरी, वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा रेकॉर्ड

Fatima Sana and Shafali Verma : वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलँड्स आणि पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका सामने खेळवण्यात आले. या सामन्यात शफाली वर्मा आणि फातिमा सना या दोघींनी बॅटिंग आणि बॉलिंगसह योगदान देत खास कामगिरी केली.

| Updated on: Jun 18, 2026 | 5:19 PM
1 / 5
टीम इंडियाची युवा विस्फोटक सलामीवीर शफाली वर्मा आणि पाकिस्तानची फातिमा सना या दोघींसाठी 17 जून ही तारीख खास ठरली आहे. या दोघींच्या नावावर 17 जून रोजी खास रेकॉर्डची नोंद झाली. या खास यादीत आता दोघींसह एकूण चौघींचा समावेश झाला आहे. (Photo: PTI/Getty Images)

2 / 5
शफाली वर्मा आणि फातिमा सना यांचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात अर्धशतकासह 3 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला. दोघींनी 17 जूनला ही कामगिरी केली. (Photo: PTI/Getty Images)

3 / 5
शफालीने 17 जून रोजी नेदरलँड्स विरुद्ध 38 चेंडूत 55 धावा केल्या. तसेच 3 विकेट्स घेतल्या. शफाली  यासह एका सामन्यात अशी कामगिरी करणारी तिसरी खेळाडू ठरली. (Photo: PTI/Getty Images)

4 / 5
भारत-नेदरलँड्स सामन्यानंतर 17 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले होते.  फातिमा सना हीने या सामन्यात 55 धावा केल्या. तसेच 3 फलंदाजांना आऊट केलं. फातिमा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करणारी एकूण चौथी खेळाडू ठरली. (Photo: PTI/Getty Images)

5 / 5
शफाली वर्मा आणि फातिमा सना या दोघींआधी वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात विंडीजच्या हॅली मॅथ्यूज तसेच दक्षिण आफ्रिकेच्या सुने लुईस या दोघींनी अशी कामगिरी केली होती. (Photo: PTI/Getty Images)

Follow Us