
टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना हा 11 ऑक्टोबरला होणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या सरावाचे फोटो शेअर केले आहेत.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अपयशी ठरला. मात्र अफगाणिस्तानच्या सामन्याआधी रोहितने आणखी जोरदार तयारी केलीय. रोहितने नेट्स प्रॅक्टिसनंतर हेड कोच राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली.

रविंद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 विकेट्स घेत कांगारुंच्या मिडल ऑर्डरचा कणा मोडला. आता जडेजाने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी बॅटिंगचाही सराव केला.

सूर्यकुमार यादव याला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात संधी मिळू शकते. सूर्याने नेट्समध्ये बॅटिंगचा सराव केला.

तसेच ऑलराउंडर शार्दुल ठाकुर याचाही अफगाणिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शार्दुलने नेट्समध्ये बॉलिंगचा जबरदस्त सराव केला.