
टी20 विश्वचषकातील सुरुवातीच्या 4 पैकी 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने श्रीलंका क्रिकेट संघाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. पण त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू वानिंदू हसारंगा याने मात्र आयसीसी टी20 रँकिगमध्ये मुसंडी मारत पहिलं स्थान मिळवलं आहे.

हसारंगा त्याच्या कारकिर्दीत प्रथम वेळीच पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यांमध्ये 3-3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे प्रथम स्थानी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीला मागे टाकलं आहे. शम्सी दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रीकेच्या एनरिक नॉर्खियानेही उल्लेखनीय कामगिरी करत 18 स्थानं वर येत सातवं स्थान मिळवलं आहे. तर राशिद खानने एक स्थान पुढे येत तिसरं स्थान मिळवलं आहे.

इंग्लंडचा ख्रिस जॉर्डनही रँकिंगमध्ये चार स्थानं पुढे येत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा इश सोढ़ी 10व्या स्थानी पोहचला आहे.

टॉप 10 मध्ये एकही भारतीय नसून ऑस्ट्रेलियाचा एश्टन एगर आठव्या, एडम जाम्पा सहाव्या, मुजीब उर रहमान पाचव्या स्थानावर आहे.