
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकलं. रोहितने या शतकासह रेकॉर्ड्सची रांग लावली. रोहितने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या.

रोहितचं वर्ल्ड कपमधील एकूण सातवं शतक ठरलं. रोहितने यासह सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. तसेच रोहित वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक ठोकणारा भारतीय ठरला. त्याने कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम उद्धवस्त केला.

रोहिने 63 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर कपिल देव यांनी 1983 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध 72 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

रोहितने वर्ल्ड कपमध्ये वेगवान 1 हजार धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर याच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितला वॉर्नर इतक्याच 19 डावानंतर 1 हजार धावांपार मजल मारता आली.

रोहितने नवीन उल हक याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकला. रोहित यासह क्रिकेट विश्वात सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत ख्रिस गेल याचा विक्रम मोडला.

दरम्यान रोहित सर्वाधिक एकदिवसीय शतक ठोकणारा तिसरा बॅट्समन ठरला आहे. रोहितने रिकी पॉन्टिंग याला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं. रोहितचं अफगाणिस्तान विरुद्धचं शतक हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 31 वं शतक ठरलं.