IND vs AUS | टीम इंडियाचे 5 मॅचविनर खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाला रडवलं

| Updated on: Mar 17, 2023 | 9:37 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील 5 हिरो ठरलेल्या खेळाडूंची कामगिरी आपण पाहणार आहोत.

1 / 5
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. केएलने मॅचविनिंग खेळी साकारली. 91 बॉलमध्ये नाबाद 75 धावांची खेळी केली.

2 / 5
मोहम्मद शमी टीम इंडियासाठी यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने बॉलिंग अटेकने कांगारुंना तंगवलं. शमीने 6 ओव्हरमध्ये 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

3 / 5
रविंद्र जडेजा याने बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. जडेजाने बॉलिंग करताना 9 ओव्हगरमध्ये 46 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने मार्नस लाबुशेन याचा अफलातून कॅच घेतला.  तर केएल राहुल याच्यासोबत बॅटिंग करताना 45 धावांची निर्णायक आणि नाबाद विजयी खेळी केली.

4 / 5
मोहम्मद सिराज यानेही या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. सिराजने 5.4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

5 / 5
कॅप्टन हार्दिक पंडया यानेही अष्टपैली कामगिरी केली.  हार्दिकने 5 ओव्हरमध्ये 29 धावा देत 1 विकेट घेतली. तर 31 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.