
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात लोकल बॉय मुंबईकर सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला. अशा प्रकारे सूर्युकमार यादव याची फ्लॉप कामगिरीची मालिका सुरुच राहिलीय.

सुर्याला श्रेयस अय्यर याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. टीम इंडियाने 189 धावांचं पाठलाग करताना 14 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर सूर्यकुमार मैदानात आला. सूर्यकुमारकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र सूर्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

सूर्याने वनडे पदार्पणानंतर काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र त्यानंतर तो अपयशी ठरला. सूर्याला टी 20 क्रिकेट प्रमाणे वनडेत कामगिरी करण्यात अपयश येत आहे. सूर्याने आतापर्यंत 21 सामन्यातील 19 डावांमध्ये 433 धावा केल्यात, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

सूर्याला गेल्या 11 पैकी 4 डावातच दुहेरी आकाडाही गाठता आला आहे. तर गेल्या 15 डावात अर्धशतक करता आलेलं नाही.

सूर्याला आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवायची असेल, तर त्याला धावा कराव्या लागतील. दरम्यान आता 19 मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.