
रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 46 धावांची खेळी केली. रिंकूने या दरम्यान 2 सिक्स लगावले. रिंकूने 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 100 मीटर लांब सिक्स खेचला.

रिंकूने लाँग ऑनच्या दिशेने 100 मीटर लांब फटका मारला. या निमित्ताने आपण टी 20 क्रिकेटमध्ये लांब सिक्स कुणी मारलाय. तसेच ख्रिस गेल आणि युवराज सिंह या सिक्स स्पेशालिस्ट फलंदाजांनी किती मीटर लांब सिक्स मारला आहे, हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंडचा ओपनर बॅट्समन मार्टिन गुप्टील याच्या नावावर आहे. गुप्टीलने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 127 मीटर लांब सिक्स मारला होता.

टीम इंडियाचा माजी स्फोटक ऑलराउंडर युवराज सिंह याने 2007 साली वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 119 मीटर लांब सिक्स मारला होता. युवराजने ब्रेट लीच्या बॉलिंगवर हा सिक्स मारलेला.

गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि युनिव्हर्स बॉस 2010 टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध 116 मीटर लांब सिक्स फटकावला होता. गेलने युसूफ पठाण याच्या बॉलिंगवर हा सिक्स मारला होता.