
आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी तयार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा केली. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अखेरची मालिका आहे. या मालिकेबाबत 5 महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली आहे.हे खेळाडू तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळतील.

नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केएल पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाची सूत्रं सांभाळणार आहे.

तसेच आर अश्विन याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अश्विन 20 महिन्यांनंतर टीममध्ये परतला आहे.

टीममध्ये स्पिन ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेल याच्या जागी संधी देण्यात आली होती.

तसेच पहिल्या 2 सामन्यांसाठी हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा हा उपकर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे ऑलराउंडर जडेजा याच्यावर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.