
आशिया कप स्पर्धेत डावखुऱ्या अभिषेक शर्माचा झंझावात सुरुच आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना फोडल्यानंतर बांगलादेशी गोलंदाज रडारवर आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्ध अभिषेक शर्माने 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. त्याने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अभिषेक शर्माचं या स्पर्धेतील सलग दुसरं अर्धशतक आहे. त्याने या आधीच्या सामन्यात पाकिस्तानला धुतलं होतं आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतकं ठोकलं होतं. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

टी20 क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेकने गुरु युवराज सिंगला मागे टाकलं आहे. त्याने पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. तर या यादीत सूर्यकुमार यादव टॉपला आहे. त्याने ही कामगिरी 7 वेळा, तर रोहित शर्माने 6 वेळा केली आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अभिषेक शर्मा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आरामात शतक करेल असं वाटतं होतं. पण दुर्दैवाने धावचीत झाला. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 75 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)